बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला, आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा चित्रपट आला आणि पडला”

मुंबई |  फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुरतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल’ कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू आहे. वैफल्य, दुसरे काय…. अशा शब्दात आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटलांचा समाचार घेतला आहे.

गांधी नेहरूंचा विचार असणारा पक्ष आणि त्यांचे नेते मातोश्रीवर लोटांगण घालताना दिसत आहेत. मी काँग्रेसचे अनेक प्रदेशाध्यक्ष पाहिले पण सत्तेसाठी एवढा लाचार प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदाच पाहतोय, अशी जळजळीत टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. तसंच शिवसेनेने देखील आज विखेंचा जोरदार समाचार घेतला आहे.

संजय राऊत अग्रलेखात म्हणतात-

“वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत.”

“लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते”

“विसरण्याच्या कलेत किती पारंगत आहोत याचे प्रयोग विखे स्वतः अधूनमधून करत असतात. विखे महाशयांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविषयी असे महान भाष्य केले, की “एवढे वर्ष काँग्रेससोबत होतो, मात्र सत्तेसाठी लाचार झालेले प्रदेशाध्यक्ष आपण यापूर्वी कधीच पाहिले नाहीत”. यावर शांत बसतील ते थोरात कसले.”

“थोरातांनीही सांगितले की “मी विखे यांना आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या पाया पडताना अनेकदा पाहिले आहे” यावर विसराळू विखेंची बोलती बंद झाली. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे”.

ट्रेंडिंग बातम्या- 

कोरोनावर मात केल्यानंतर आव्हाड पुन्हा मैदानात, पिंपरी चिंचवडच्या झोपपट्टीसंदर्भात केली मोठी घोषणा

आई-बाप दगड फोडायचे; मात्र बेलदाराचं पोर झालं डीवायएसपी!

महत्वाच्या बातम्या-

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईन आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, या अभिनेत्रीचा दावा

MPSC निकालात मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान आणि आनंद वाटला- छत्रपती संभाजीराजे

गुडन्यूज… भारतात कोरोनावरच्या या औषधाला परवानगी, औषध गेमचेंजर ठरण्याची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More