बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर लोक या महाराष्ट्रद्रोह्यांना जागोजागी चपला मारतील”

मुंबई | राणा दांपत्याला भेटायला गेलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) शिवसैनिकांनी हल्ला केला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमय्या जखमी झाल्यानंतर भाजप (BJP) चांगलंच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. हल्ला झाल्यानंतर सोमय्यांनी आज भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या भेटीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या दोन वर्षात केंद्रीय गृहसचिवांना भाजपचं शिष्टमंडळ 7 वेळा भेटून आलं. दोन चार लोकं जातात. दिल्लीला उतरतात, पत्रकारांना भेटतात, महाराष्ट्राची बदनामी करतात. महाराष्ट्राच्या बदनामीचे हे षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र असंच सुरू राहिलं तर लोक या महाराष्ट्रद्रोह्यांना जागोजागी चपला मारतील, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

आता कुणालातरी ओठाखाली रक्त आलं आहे, त्यासाठी राष्ट्रपती राजवट लावा असं सांगत आहे. यांना काही ना काम ना धंदा, अशा खोचक शब्दात संजय राऊतांनी सोमय्यांवर टीका केली आहे. राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एकत्रित लावा. ही सगळी ढोंगं चालली आहे, असंही राऊत म्हणाले.

दरम्यान, उत्तर प्रदेशात सरकार आल्यापासून मागील 3 महिन्यात 17 बलात्कार झाले. तिथे लावता का राष्ट्रपती राजवट?, असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात या लोकांना कामधंदा नाही, अशी खोचक टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ खास कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय शाहरूखचा मन्नत बंगला

महाराष्ट्रावर दुहेरी संकट, हा आठवडा महत्त्वाचा

‘राष्ट्रपती राजवट लावा…’; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, पंतप्रधान मोदींनी घेतला महत्त्वाचा निर्णय

“बाजारात नवी ऑफर, ठाकरे सरकारविरूद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More