बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात”

मुंबई | ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) मुंबईत दाखल झाले आहे. राणा दांपत्य मुंबईत दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

राणा दांपत्य मुंबईत दाखल होताच ‘मातोश्री’ व ‘वर्षा’ बंगल्याबाहेर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले आहेत. राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असताना शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणा दांपत्यासह भाजपवर (BJP) देखील जोरदार निशाणा साधला आहे.

हनुमान चालिसा वाचणं, रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकीचे आणि स्टंटचे विषय नाहीत. पण अलिकडे भाजपने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंटबाजी केली आहेत आणि हे त्यातलेच पात्र आहेत. लोक त्यांच्या हिंदुत्वाला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, हे फिल्मी लोक आहेत. स्टंटबाजी करणं, मार्केटिंग करणं त्याचं काम आहे. त्यांना स्टंटबाजी करू द्या आम्हाला फरक पडत नाही, असंही संजय राऊत म्हणाले. तर राऊतांनी राणा दांपत्याचा ‘बंटी बबली’ असा उल्लेख करतही त्यांच्यावर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“बंटी बबली मुंबईत पोहोचले तर पोहचू द्या, त्यांना अजून…”

‘भाजप इतका जूना पक्ष की…’; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

नवाब मलिकांना दिलासा नाहीच, ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात, आता…

रशियाची मोठी खेळी, रशिया-युक्रेन युद्ध आणखी चिघळणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More