बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले तीन जाचक कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसह शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला संबोधलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकार हे कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली.

पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतरवसे शिना खासदार संजय राऊत यांनी केंद्राच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मानवतावादी सरकार शेतकऱ्यांचा बळी जाताना उघड्या डोळ्यांनी पाहात होतं पण मोदी सरकारने वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

सरकारनं शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका आधीपासूनच अडमुठेपणाची होती. आंदोलकांना दहशतवादी, खलिस्तानी म्हटलं, पण शेतकरी अन्नदाता आणि देशाचा आत्मा असल्याचा विसर सरकारला पडला असल्याचा घणाघात राऊतांनी केला. तर शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले आणि अखेर सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावं लागलं, असंही संजय राऊत म्हणाले.

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांत भाजपला फटका बसला आणि त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येत्या निवडणुकीतही भाजपला फटका बसेल या भीतीने तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

‘आम्हीच कमी पडलो’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली देशाची माफी

मोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

“स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More