बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सध्याचे हेच हिंदू तेव्हा पळून गेले होते’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी भाजपला अनेक टोले लगावले.

‘आमचं हिंदुत्व केवळ मंदिरापुरतं व राजकारणापुरतं मर्यादित नाही’, असा खोचक टोला संजय राऊतांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) काय म्हणतात यावर भूमिका ठरत नाही, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.

‘या देशात हिंदुंची वोटबँक आहे हा विचार बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी मांडला. अयोध्येत बाबरीचं पतन होत असताना सध्याचे हिंदू वोट बँकवाले पळून गेले होते. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे राहिले होते’, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

‘बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. आमचं हिंदुत्व शेपुट घालणारं आणि पळपुटं नाही. आमचं हिंदुत्व लोकांना अन्न वस्त्र निवारा मिळावा यासंदर्भात जोडलेलं आहे’, असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘आईच्या इज्जतीची पर्वा आहे की नाही’; …म्हणून अभिनेत्रीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना

महेश मांजरेकरांनी सोडला ‘बिग बॉस’; ‘हे’ धक्कादायक कारण आलं समोर

अखेर दोन वर्षानंतर उघडले शाळेचे दार; ‘असं’ केलं विद्यार्थ्यांचं स्वागत

राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चानंतर रूपाली पाटील शिवसेनेच्या वाटेवर?, ‘त्या’ भेटीमुळे गुढ वाढलं

मोठी बातमी! 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत नवीन नियमावली, ‘हे’ असणार नवे नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More