बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच”

मुंबई | मोदींनी सर्जिकल स्ट्राईकही 24 तासांत केला होता. पण सहा महिने उलटले तरी राज्यपालांचं नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीबाबत संशोधन सुरूच आहे, असा खोचक टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लगावला आहे.

12 सदस्याचं सदस्यत्व रोखून ठेवणं हा घटनेचा भंग आहे. यात राजकारण असून हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. राजभवनात काही तुफान आलं असावं आणि त्या वादळात फाईल वाहून गेल्या असाव्यात. किंवा तिथे भूतप्रेत आलं असेल म्हणूनच त्या फायली गायब झाल्या, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांना मदत करतीलच. पण महाराष्ट्राला लुटायचं काम दिल्लीवाले करत आहेत. त्यांची काही जबाबदारी नाही का?. तुम्ही गुजरातला एक हजार कोटी रुपये देऊ शकता. परंतु महाराष्ट्राचा आक्रोश आणि वेदना तुम्हाला कळत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

बारावीच्या परिक्षेसंदर्भात ‘या’ राज्यानं केली मोठी घोषणा; विद्यार्थी घरबसल्या देणार पेपर

इंडिया VS पाकिस्तान सामन्यावर यंदाही विर्जन; टीम इंडियाची आणखी एक स्पर्धा रद्द

डोळ्यात मिरची पावडर फेकून 19 लाख रुपये लुटण्याचा प्रयत्न; 40 CCTV तपासल्यानंतर आरोपी अटकेत

पुण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता!

लग्नाच्या वाढदिवसाला दिलेला एक किलो सोन्याचा हार निघाला नकली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More