महाराष्ट्र मुंबई

“निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये”

मुंबई | बिहारमध्ये मोफत कोरोना लस देण्याच्या भाजपच्या आश्वासनावर अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला. यावरून निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांनी थेट निवडणूक आयोगाला लक्ष केलंय.

निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीचीच एक शाखा आहे. एक घटनात्मक प्राधिकरण असूनही निवडणूक आयोग भाजपवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

तेजस्वी यादव या युवा नेत्याकडे कोणाचाही पाठिंबा नाही तसेच सीबीआय आणि ईडी सारख्या संस्था त्यांच्या मागे लागल्या आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्य तुरुंगात आहेत. तरीदेखील ते केंद्र सरकारला आव्हान देत आहेत, असंही राऊत म्हणालेत.

केंद्र सरकार विरोधी पक्षांना दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तरिही तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही

“पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं”

तुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या