बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर…”

मुंबई | शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

अहो! शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, असा टोला राऊतांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे. तसेच पाटील यांना असले सुंदर विचार सुचतातच कसे?, याचा तपास केला पाहिजे, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार, असे प्रसंग उभे झाले होते. पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रात ठेवली. चंद्रकांत पाटलांसारखी माणसे मुंबईत येऊन आज जाहीरपणे बोलू शकतात, शिवसेना नसती तर तेही शक्य झालं नसतं, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला. चंद्रकांत पाटलांचे ब्रिटिशांवर फारच प्रेम दिसते. त्यांना जाऊन बराच काळ झाला. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, हे जरा महाराष्ट्रात जाऊन जनतेला विचारा. वाटल्यास या विषयावर सार्वमत घ्या, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; वाचा केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

“मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही, पण आम्ही काय भिकारी आहोत का?”

“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More