बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांत पाटील म्हणजे निरागसतेचं लेणं, एक निष्पाप बालक”

मुंबई | भाजपमधल्या चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे जसं मनास येईल ते बोलतात तसंच नानांचंही आहे. नाना विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत, अशी तुलना शिवसेनेनं सामनाच्या अग्रेलखातून केली आहे.

भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगड्या बोलीचे आहे, असं म्हणत शिवसेनेन अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

नाना पटोले हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना…. नाना प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत ते त्यांच्या वक्तव्यांमुळे. नाना त्यांची मन की बात व्यक्त करतात. सध्याचा अतिजागरूक मीडिया त्यांच्या मन की बातची बातमी करून मोकळा होतो, असं अग्रलेखात म्हटलंय.

नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळालं असेल तर ते बरंच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकलं असं वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार स्वबळास उत्तरं दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही, असं पवार यांनी जाहीरपणे सांगितलं ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचं भवितव्य अजिबात अवलंबून नाही, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

अनिल देशमुख यांच्यानंतर आता सुपुत्र ‘सलिल देशमुख’ ईडीच्या रडारवर?

“लक्षात ठेवा, आम्हाला डिवचल्यास बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही”

पिंपरी चिंचवडमधील भाजप नगरसेविका अर्चना बारणेंचं निधन

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट

महाविकास आघाडीतील वाद शरद पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More