महाराष्ट्र मुंबई

सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?- संजय राऊत

मुंबई | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शांत, संयमी आंदोलनाने अचानक उग्र रुप धारण केलं आहे.

शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. आंदोलकांकडून तोडफोड आणि पोलिसांकडून लाठीचार्जच्या घटना घडल्या आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकरी आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचे म्हणणं ऐकलं नाही. ही कुठल्या प्रकारची लोकशाही आमच्या देशात वाढत आहे. ही लोकशाही म्हणता येत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

संतप्त शेतकऱ्यांमध्ये अडकला होता पोलीस कर्मचारी, मदतीसाठी एक शेतकरीच धावला!

रेणू शर्माने बलात्काराचा आरोप मागे घेतल्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

हिंसेनं कोणत्याही समस्या सुटू शकत नाही- राहुल गांधी

धक्कादायक! आंदोलनकर्त्यांचा पोलिसांवर तलवारी घेऊन हल्ल्याचा प्रयत्न, एक पोलीस जखमी

“विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला मराठा भूषण पुरस्कार देेऊ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या