बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जेवणाच्या ताटावरुन उठवलं, आणखी कशावरुन उठवायचं सांगा”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांच्या उपस्थितीत पुण्याच्या वडगाव शेरीत शिवसेनाचा कार्यकर्ता मोळावा पार पडला. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करताना राऊत यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी बोलताना राऊतांनी भाजप नेते नारायण राणेंवर देखील निशाणा साधला आहे.

अटक झाली ना, जेवता ताटावर उठवला अजून कशावरून उठवायचा ते सांगा तिथूनही उठवतो. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका शिवसेना हि आग आहे, असा इशाराही राऊंतांनी राणेंना दिला.

बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच शासकीय पद स्विकारलं नाही. त्यांना अनेक पदांची लालसा धरता आली असती. पण कोणत्याही पदावर बसलेले नसताना या देशाच्या सगळ्यात मोठा सत्ताधीश कोण असेल तर तो बाळासाहेब ठाकरे होता. त्यामुळे जे मंत्री, आमदार, खासदार होतात त्यांना सांगतो, हे काही नाही, असं राऊत म्हणाले.

मी कधीही केंद्रामध्ये संधी असताना मंत्री झालो नाही कारण मला ‘सामना’चं पद सोडावं लागेल. ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जिथे पक्षाचं काम आहे तिथे मी काम करतो. मंत्रिपदं येतात आणि जातात. मग माजी, मला माजी म्हणू नका. आम्हाला कधी कोणी माजी म्हणणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

हर्षल पटेलची हॅट्रिक! हार्दिक, पोलार्ड आणि राहुलला दाखवला घरचा रस्ता

बंगळुरूचा राॅयल विजय! मुंबई इंडियन्सचा 54 धावांनी दारूण पराभव

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

नाना पटोले म्हणतात, “मी बोलतो तेच करतो, दादापेक्षा नाना मोठा…”

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More