पुणे महाराष्ट्र

“…म्हणून फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या मनाला, बुद्धीला चालना मिळते”

मुंबई | संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, कोरोना स्थितीवरही लेखन करावं, असा सल्ला देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊत यांना टोला लगावला होता. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामनाचे निष्ठावंत वाचक आहेत. सामना वाचल्यानं ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सामना वाचतात. त्यामुळेच त्यांच्या बुद्धीला आणि मनाला चालना मिळते. सामना वाचत असल्यानं ते मुख्य प्रवाहात येत आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, अशी बोचरी टीका राऊत यांनी आहे.

सामनामध्ये कोरोनावर लिखाण करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीस यांना राऊत यांनी उत्तर दिलं. फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांमधील सामना नीट वाचवा. त्यांना कोरोनावरील लिखाण वाचायला मिळेल, असं राऊत म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या-

कोरोना काळात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणं चुकीचं -राहुल गांधी

जिओमीट हुबेहुब झूमसारखं; झूम जिओला कोर्टात खेचणार?

पुण्यात पुन्हा कडक लॉकडाउन, अजित पवारांची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या