बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच तर UP भाजपचे 160 आमदार बाद होतील”

मुंबई | योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लावलाच तर भाजपचे 160 आमदार बाद होतील, असं म्हणत खासदार रवी किशन हे लोकसभेत लोकसंख्या नियंत्रणाचे खासगी विधेयक मांडून चर्चा घडवणार आहेत, आता काय करायचं?, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाच्या रोखठोक या सदरातून भाजपला लगावला.

उत्तर प्रदेशातील योगी सरकार त्यांच्या राज्यापुरता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणत आहे. त्यामुळे राजकीय गहजब माजला आहे. राममंदिराचा विषय मार्गी लागला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत राममंदिरावर मते मागता येणार नाहीत. लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणून हिंदू-मुसलमान असे विभाजन करण्याचा हा नवा प्रयोग असल्याचं बोललं जात आहे, असं राऊत म्हणालेत.

उत्तर प्रदेशात योगी सरकार लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा करत आहे. त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहायला हवे… प्रत्येक चांगल्या गोष्टीत धर्म, जात आणि राजकारणाचा कोलदांडा घातलाच पाहिजे असे नाही, असं म्हणत राऊतांनी योगींनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याचं स्वागत केलं आहे.

उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या कायद्यास विरोध केला आहे. हा कायदा मुसलमानविरोधी आहे असं ते म्हणतात. नितीशकुमार यांचा लोकसंख्या नियंत्रण कायद्यास विरोध असेल तर भाजपने त्यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांच्या लसीकरणबाबत सरकारने उचललं मोठं पाऊल!

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा ‘या’ तारखेपर्यंत बंदच राहणार!

पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले…

‘पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्या तर…’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याची खुली ऑफर

“शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करु, म्हणणाऱ्या अण्णांची फडणवीसांच्या भेटीनंतर भूमिका बदलली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More