बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वाटलं तर तुम्ही जो बायडन यांनाही प्रचाराला आणा, शिवसेना घाबरत नाही”

सिल्वासा | दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत एका हॉटेलमध्ये आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी व मुलाने काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश करून पोटनिवडणूकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली. सध्या दादरा नगर हवेली येथे पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.

पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक दिग्गज राजकीय नेते येथे प्रचारासाठी येत आहेत. त्यातच शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे देखील प्रचारासाठी आज दादरा नगर हवेली येथे गेले आहेत.

प्रचारादरम्यान पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी भाजपवर शरसंधान साधत रेल्वेमंत्री प्रचाराला येत आहेत, इतरही काही मंत्री येतील, वाटलं तर तुम्ही जो बायडन यांना देखील प्रचाराला आणा, पण शिवसेना अजिबात घाबरत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.

दादरा नगर हवेली पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार यात शंका नाही. पण आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कोणत्या थराला जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

‘वसुली सरकार भरती काढत नाही आणि काढली तर सावळा गोंधळ घालतं’; पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

‘त्या’ लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय?, नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलं

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More