बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इंधन दरवाढीविरूद्ध आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपुन बसले आहेत?”

मुंबई | संपुर्ण देशभरातील नागरिक सध्या इंधन दरवाढीला कंटाळले आहेत. त्यातच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी यावेळी अग्रलेखातून काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने विमानाच्या इंधनाच्या किंमतीलाही मागे टाकल्याचं म्हणत काँग्रेस काळात इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करणारे कोणत्या बिळात लपून बसले आहेत?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

मनमोहन सिंह सरकारच्या काळात भाजपने इंधन दरवाढीविरोधात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत रणकंदन माजवलं होतं. ती मंडळी आता कुठे आहेत?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे आणि थेट भाजपवर तिखट शब्दात शरसंधान साधल्याचं पाहायला मिळालं आहे.

इंधन दरवाढीवरून दरदिवशी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकार मात्र दरवाढ रोखण्यासाठी काही विशेष प्रयत्न करत असल्याचं दिसून येत नाही. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून हाच मुद्दा अधोरेखित करत केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे.

‘देशातील परिस्थिती कठीण असतानाही इंधनाचे दर आटोक्यात ठेवणाऱ्या मनमोहन सिंहांवर वाटेल तशी चिखलफेक करणारे लोक सध्या सत्तेत आहेत आणि इंधन दरवाढीवरून काहूर माजवणारे भाजप नेते आता मूग गिळून गप्प का बसले आहेत?’, असं परखड भाष्य आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

राज्यातील कॉलेज उद्यापासून सुरू, मात्र या नियमांचं करावं लागणार पालन, वाचा सविस्तर

“सत्ता गेल्यावर कुणाचा तोल जातो तर कुणी भ्रमिष्ट होतं”

शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांचा घुमजाव

रिझर्व बँकेची एसबीआयवर मोठी कारवाई, ठोठावला तब्बल एवढा दंड

राज्यात आणि देशात काॅंग्रेस सक्षम पर्याय! नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More