बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”अंधार आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का?”

मुंबई | सध्या संपुर्ण देशासमोर विजेचं गंभीर संकट पाहायला मिळत असताना या प्रकरणात केंद्र सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आणि तिखट शब्दात टीका करण्यात आली आहे. भारतातच कोळसा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे विजनिर्मीतीवर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसत आहे.

विजनिर्मीती अडचणीत सापडली असताना आणि संकटं आ वासून उभी असताना त्यातून मार्ग काढणं हे केंद्र सरकारचं काम असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशात कोळशाअभावी विजनिर्मीतीवर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे एकीकडे ढोल पिटले जात असताना आता विजनिर्मीतीचं संकट उभं टाकल्याने अंधार जर आणखी गडद होणार असेल तर हा बदलत्या देशाचा नवा विकास म्हणायचा का? असा प्रश्नही अग्रलेखाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

देशात एकुण 135 औष्णिक विद्युत निर्मीती केंद्र आहेत ज्यापैकी 100 औष्णिक विद्युत केंद्रातील कोळश्याचा साठा संपत आला आहे. तर अनेक ठिकाणी अवघा आठवडाभर पुरेल एवढाच साठा आहे. सध्या सरकारच्या बैठकांचं सत्रं सुरू आहे यातुन मार्ग निघाला तर ठिक पण एवढं नाकातोंडात पाणी जाईपर्यंत सरकार काय करत होतं? हा प्रश्न उरतोच, असं म्हणत सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘या’ ठिकाणी मुसळधार पावसानं घर कोसळून पाच जण ठार

लखीमपूर प्रकरणात मोठी घडामोड,सर्वोच्च न्यायालयाची गंभीर पावलं; सरकारच्या अडचणी वाढणार?

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

#IPL2021 अटीतटीच्या सामन्यात हैदराबादचा बंगळुरूवर ‘रॉयल’ विजय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More