बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…हे लावालावी करायचं काम संजय राऊत करतात’; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघाती हल्ला

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सिंधुदुर्ग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर ताशेरे ओढल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची खेळी चांगलीच रंगली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. आता यावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना, संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे, त्यांचे नेते शरद पवार की उद्धव ठाकरे? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच पेटल्याचं पहायला मिळत आहे.

संजय राऊत दिल्लीत ते शरद पवार यांच्याच कार्यालयात असतात. जसे ते दाखवतात तसे ते नाहीत. हे लावालावी करायचं काम… त्याचं नाव संजय राऊत, अशा शब्दांत राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

दरम्यान, भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता.

थोडक्यात बातम्या – 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक! केली होती ‘ही’ मोठी घोषणा

मोठी बातमी! आज होणारी म्हाडाची परिक्षा रद्द, आता ‘या’ महिन्यात होणार परिक्षा

“राहुल गांधींची सभा असेल तर काही नाही, पण आम्ही आलो तर कलम 144 लावला जातो”

कोरोना लस घेण्यासाठी दिवसातील योग्य वेळ कोणती?; तज्ज्ञांचा मोठा खुलासा

महाराष्ट्र कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More