बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचं आणि आपल्याच…”

मुंबई | एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून भारतीय जनता पक्षाशी गठबंधन करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर गेले 10 दिवस सुरु असलेले सत्तानाट्य संपलं. गुरुवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यानंतर मान्यवर आणि अनेक नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर भाष्य केलं आहे. त्यात शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखातून पंतप्रधान, भाजप आणि नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

सत्ता सर्व प्रश्नांचे उत्तर. महाराष्ट्रात गुरुवारी जे घडलं त्यावरुन सत्ता हेच सर्वस्व आणि बाकी सगळं झूठ यावरच शिक्कामोर्तब झालं. अनैतिक मार्गाने का होईना, तुम्ही सत्ता मिळवली, पण पुढे काय?, असा थेट प्रश्न सामनातून करण्यात आला आहे. कौरवांनी द्रौपदीस भरसभेत अपमानित केलं. आणि धर्मराजासह सगळे निर्जीव बनून हा तमाशा पहात राहिले. तसेच काहीसं महाराष्ट्रात घडलं. पण शेवटी भगवान श्रीकृष्ण अवतरले. त्यांनी द्रौपदीच्या अब्रुचे रक्षण केलं. जनता जनार्दन हा श्रीकृष्णाप्रमाणे अवतार घेईल आणि महाराष्टाची अब्रु लुटणाऱ्यांवर सुदर्शन चक्र चालवील. नक्कीच! असंही अग्रलेखात म्हंटलं आहे.

पक्षातून बाहेर पडून दगाबाजी करणाऱ्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याने कारवाई सुरु करताच न्यायालयाने ती रोखली आणि पक्षांतरबंदी कारवाईशिवाय बहुमत चाचणी घ्या, असं सांगितलं. राज्यपाल आणि न्यायालयाने सत्य खुंटीस टांगून ठेवले आणि निर्णय घेतले. त्यामुळे विधीमंडळाच्या भिंतीवर डोकं फोडून घेण्यात अर्थ नव्हता. पक्षांतर करणाऱ्या, पक्षादेश मोडणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल लागेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगणे घटनाबाह्य आहे. पण घटनेचे रखवालदारच अशी बेकायदेशीर कृत्य करु लागतात. तेव्हा कोणाकडे अपेक्षेने पहायचे?, असा सवालही शिवसेनेनं केलाय.

जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तीस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे. विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत रहाणार? शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरवलेल्या सैन्याने उघड केल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! सत्तेत येताच ठाकरे सरकारचे दोन निर्णय शिंदे-फडणवीसांनी बदलले

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी

मोठी बातमी! शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस

‘भाजपला अटलजींच्या विचारांची गरज’; ‘सामना’तून भाजपवर टीकेचे बाण

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे कळल्यावर मी गादीवर दणादणा उड्या मारल्या”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More