संजय राऊत मोठे नेते, सरकार स्थापनेत त्यांचं योगदान आहे पण…- बाळासाहेब थोरात
मुंबई | संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते संपादकही आहेत. महाविकासआघाडीचं सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र, तरीही ‘यूपीए’चे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडेच राहील. ‘यूपीए’चा अध्यक्ष बदलावा अशी परिस्थिती सध्या नाही, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात अहमदाबाद येथे झालेल्या कथित भेटीसंदर्भातही भाष्य केले. जी भेट झालीच नाही त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अशाप्रकारचा संभ्रम निर्माण करुन उपयोग नाही. भाजपने काहीतरी अफवा पसरवू नयेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
आपण शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करत असल्याचेही थोरात यांनी सांगितले. याचदरम्यान, ‘यूपीए’च्या अध्यक्षपदावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक वादावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला. संजय राऊत हे चंद्र, सूर्य किंवा मंगळ अशा कोणत्याही विषयावर भाष्य करु शकतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, ‘यूपीए’च्या अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीत नाराजीची ठिणगी पडली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘यूपीए’च्या अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचे नाव सुचवले होते. यावरुन काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता.
थोडक्यात बातम्या –
धाडसी अंगरक्षकाने पोलीस अधीक्षकांवर होणारा तलवारीचा वार अंगावर झेलला!
31 मार्चपर्यंत करून घ्या ‘हे’ महत्वाचं काम अन्यथा तुमचं पॅनकार्ड होऊ शकतं रद्द!
लोकांच्या विरोधानंतरही सरकार लॉकडाऊन लावणार? राजेश टोपे म्हणाले…
भारत नानांच्या पेहरावात भगीरथ दादा, राष्ट्रवादीचा सहानुभूतीचा प्रयत्न!
‘विठुरायाच्या नगरीची दुरवस्था बघवत नाही’; बिचुकलेंनी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी दाखल केला अर्ज
Comments are closed.