शिंदे गट विरूद्ध शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईवरून संजय राऊत आक्रमक, म्हणाले…
मुंबई | शिवसेना विरुद्ध शिंदे गट वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेने पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी कारवाई करत 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविली होती. या नोटीसांना आव्हान देत शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेला. या याचिकेवर न्यायालयात न्यायमुर्ती सूर्यकांत (Justice Suryakant) आणि जे. बी. पारडीवाल (Justice J. B. Pardiwal) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.
आज (दि. 11 जुलै) रोजी त्यावर सुनावणी होणार होती. परंतु सोमवारच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याने सुनावणी लांबणीवर पडणार आहे. शिवसेनेचे वकील, एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाला तारीख मिळण्यासंदर्भात विनंती करणार आहेत. यावर बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
संपुर्ण देश न्यायालयाकडे एका अपेक्षेने पाहात आहे. राज्यात बेकायदा सरकार लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. याकरीता राजभवन, विधीमंडळाचा वापर करण्यात आला आहे. या सगळ्याविरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने शिवसेना न्यायालयात गेली आहे. या देशात लोकशाही (Democracy) आहे की नाही, देशाचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो की नाही, याचा निर्णय यानिमित्ताने लागणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी वक्तव्ये समोरच्या बाजूने केली जातात आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले. देशातील सर्वोच्च न्यायपालिका कोणाच्या खिशात असू शकत नाही, या देशाची न्यायव्यवस्था (Judiciary) कोणाची बटीक किंवा गुलाम असू शकत नाही. म्हणून आम्ही आशेने सर्वोच्च न्यायालयाकडे पाहात आहोत.
थोडक्यात बातम्या –
गोव्याच्या राजकीय वातावरणात बिघाड, सोनिया गांधींनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
‘नामांतराविषयी आमच्याशी चर्चा झाली नाही’, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा
‘आज खऱ्या अर्थाने मी तणावमुक्त झालो’ -दिलीप वळसे पाटील
बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर
महाविकास आघाडी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.