बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर का होणार नाही?”

पुणे | सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सातत्याने कोणत्या न कोणत्या मुद्यावरुन एकमेकांवर बरसताना दिसत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. पिंपरी चिंचवडमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते.

यावेळी राऊत म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेचा महापौर बनवणे हे शिवसेनेचं ध्येय आहे. शिवसेनेचे पिंपरी चिंचवडमध्ये किमान 50 नगरसेवक निवडून आणायचे हे पक्षाचं उद्दीष्ट आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर  50 नगरसेवकांमध्ये पिंपरी चिंचवडचा महापौर होत नसल्याचं पत्रकारांनी म्हटलं. यानंतर 55 आमदारांमध्ये मुख्यमंत्री झाला, 50 नगरसेवकांमध्ये महापौर का होणार नाही? असा सवाल करत राऊतांनी टोलेबाजी केली.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, ईडी, सीबीआय यांसारख्या यंत्रणांची प्रतिष्ठा केंद्र सरकारने धुळीला मिळवली आहे. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन घेणारे नेते जास्त काळ टिकत नाहीत.

सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. मात्र, हे सर्व फार काळ चालणार नाही. या यंत्रणांना फक्त विरोधी पक्षातील नेत्यांच्या घराचे पत्ते माहित आहेत, सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे माहित नाहीत. मात्र, आम्ही त्यांना सत्ताधाऱ्यांचे पत्ते देखील पाठवू, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

“ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू आहे”

…म्हणून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं – देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More