मुंबई | युतीचा मुख्यमंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेच बनतील, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपदासाठी एका नव्या तजेलदार आणि उत्साही चेहऱ्याची गरज आहे आणि तो चेहरा आदित्य ठाकरेंचा आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे हा चेहरा महाराष्ट्राला दिशा देऊ शकतो. देशाला नवीन कल्पना, नवे विचार देऊ शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
-सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं- राजू शेट्टी
-जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त
-रामदास आठवलेंचा ‘वंचित बहुजन आघाडी’वर धक्कादायक आरोप
-रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विमान आता पाकिस्तानातून जाणार नाही!
Comments are closed.