“पदरात काहीच नाही, तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच”
मुंबई | महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा विस्तार करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला असून महाराष्ट्राबाहेर त्यांचं पारडं हलकं पडत असल्याचं दिसत आहे. बाहेरील राज्यांत शिवसेनेची जादू चालत नसल्यानं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं. तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच, असं म्हणत अतुल बातखळकरांनी सेनेला खोचक टोला लगावला आहे.
गोव्यात आणि उत्तर प्रदेशात शिवेनेचा फ्लाॅप शो दिसत असून शिवसेनेवर टीकास्त्र डागलं जात आहे. अशातच आता राज्यातील नेत्यांनीही शिवसेना दारेवर धरलं असून आरोपांची मालिका सुरु झाल्याचं दिसत आहे.
दरम्यान, गोवा, युपी निवडणुकीत शिवसेनेच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझीट जप्त होतांना दिसत आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे.
वसूली सेनेच्या स्टार प्रचारकांनी प्रचारा दरम्यान हाणलेल्या फिश करी-राईस व्यतिरिक्त यंदाही पदरात काही पडलेले नाही, फक्त पाव टक्के मतं.तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच… pic.twitter.com/A3VmwEA0SC
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2022
थोडक्यात बातम्या –
सर्वात मोठी बातमी! पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांचा पराभव
महाराष्ट्राच्या बाहेर शिवेसनेच्या ‘फ्लाॅप शो’वर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“प्रस्थापित राजकीय पक्षांना नाकारून पंजाबने देशासमोर आदर्श ठेवलाय”
Goa Election Result 2022: मनोहर पर्रीकरांच्या मुलाचा भाजपला जोर का झटका
Up Election Result 2022: पहिल्या दीड तासात शिवसेनेचा फ्लाॅप शो
Comments are closed.