नाशिक महाराष्ट्र

“राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये”

नाशिक | शिवसेना नेते संजय राऊत यांनी विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्तीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधलाय.

राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

12 आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. राज्य सरकारने केलेल्या शिफारशी स्वीकारणे राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये, असं राऊत म्हणालेत.

राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात”

‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

जॅकलिनने प्रियांका चोप्राचं जुहूमधील जुनं घर केलं खरेदी, किंमत वाचून आश्चर्यचकित व्हाल!

“शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या