बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावं लागेल”

मुंबई | लस जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणी वळवळ करत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावं लागेल, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका केली आहे.

कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात, मुंबईत लसीचा ठणठणाट आहे व पंतप्रधानांनी ‘लस उत्सव’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. पंतप्रधानांचा ‘लस उत्सव’ साजरा करण्यासाठी तरी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी दिल्लीत जाऊन एक कोटी लसींचं पार्सल घेऊन यावं, असा टोला राऊतांनी भाजपला लगावला आहे.

राजकीय भांडणे आहेत, पण त्या भांडणात आपल्याच लोकांचा जीव का घ्यायचा? महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलंच होतं ना. तेवढे तरी इमान राखा. ‘लस’ जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही, अशा शब्दांत राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारलं आहे.

कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. पण संकटाचं भान न ठेवता यानिमित्त जी राजकीय हुल्लडबाजी सुरू आहे ती महाराष्ट्राच्या परंपरेस शोभणारी नाही. महाराष्ट्रात कोरोनावरील लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला व यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण!

खळबळजनक! आणखी एका रूग्णालयातील 35 डॉक्टरांना लस घेतल्यानंतरही झाली कोरोनाची लागण

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या- नरेंद्र मोदी

नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More