मुंबई | भारतीय जनता पक्षाची तीन लोकं सतत ईडीच्या कार्यालयात जात आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. पुराव्यांशिवाय मी बोलत नाही. वेगवेगळ्या मार्गांनी मला धमकावलं, पण मी त्यांचा बाप आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. तसेच नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल, असं राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचं सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे, असं भाजप नेते म्हणत आहेत. बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला आहे.
गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
भाजपला रोखणाऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जात आहेत- संजय राऊत
प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन!
दिल्लीत धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं उद्घाटन
तुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरतंय?- नवाब मलिक
‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र