महाराष्ट्र मुंबई

“आता भाजपवाले शरद पवार, उद्धव ठाकरे आणि जो बायडन यांचा राजीनामा मागणार का?”

मुंबई | गेल्यावर्षी शाहीनबागेच्या निमित्ताने अशीच परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. देशात वारंवार अशी परिस्थिती निर्माण करणं, हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं.

आजच्या घटनेनंतर दिल्लीत एखादा दुसरा पक्ष सत्तेत असता तर भाजपकडून प्रमुखांचा राजीनामा मागितला गेला असता. मग आता भाजपचे नेते आजच्या घटनेनंतर कोणाचा राजीनामा मागणार? ते ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे की जो बायडन यांचा राजीनामा मागणार, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावलाय.

केंद्र सरकारने योग्यवेळी शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेतल्या असत्या तर आजचा काळा दिवस उगवलाच नसता, असं संजय राऊत म्हणालेत.

शेतकऱ्यांना शांततापूर्ण मार्गाने ट्रॅक्टर रॅली काढण्याचे आश्वासन पाळले नाही. मात्र त्यामुळे हिंसाचाराची जबाबदारी फक्त शेतकऱ्यांवर ढकलता येणार नाही. या परिस्थितीसाठी दोन्ही पक्ष जबाबदार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा, कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये- शरद पवार

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका- कंगणा राणावत

“राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज शरम दिसली”

14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुलं; तरीही IPS होण्यापासून तिला कोणी रोखू शकलं नाही!

मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या