मुंबई | शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
आज अचानक काय झालं? शेतकऱ्यां चा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का?, असा सवाल संजय राऊत यांनी सरकारला केला आहे.
दिल्लीच्या रस्त्यावर आज अराजकता निर्माण झाली आहे. पंजाब अशांत व्हावा, पंजाबच्या लोकांना खलिस्तानी ठरवून अराजकता निर्माण करावी हे षडयंत्र आहे का? आज हे घडायला नको होतं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
14 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी दोन मुलं; तरीही IPS होण्यापासून तिला कोणी रोखू शकलं नाही!
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील काही भागातील इंटरनेट सेवा बंद
“दिल्लीतील शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान जबाबदार”
दिल्लीतील शेतकरी-पोलिसांच्या चकमकीत एका शेतकऱ्याचा मृत्यू
सरकार याच दिवसाची वाट पाहत होतं का?- संजय राऊत