Top News महाराष्ट्र मुंबई

“दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे… आम्ही म्हटलं, का नया है वह”

मुंबई |  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेली टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती. पत्रकार परिषद घेऊन आदित्य यांच्या टीकेची फडणवीसांनी व्याजासकट परतफेड केली तसंच ‘नया है वह’ म्हणत आदित्य यांची खिल्ली उडवली. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

“राजकारणात येणारा प्रत्येक माणुस नवीनच असतो. दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे आहे.  पण आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह….?? मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात ते सुद्धा नवे होते. मात्र हे जरी दिल्लीच्या राजकारणात नवीन असले तरी कलम 370 हटवण्यासारखा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आमच्याकडे चांगल्याला चांगलंच म्हटलं जात. आम्हाला शिकवण आहे तशी…” अशा शब्दात फडणवीसांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

आदित्य यांचं कौतुक करताना संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे तरूण आहेत. तडफदार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अगदी झोकून देऊन काम करत आहेत. वरळी कोळीवाडा त्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रणाखाली आला. तसंच त्यांची टीम कोरोनाच्या काळात चांगलं काम करत आहे.”

दुसरीकडे, पवारांच्या मुलाखतीवरून भाजपने राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, “पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मतं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. भाजपचं देखील मुखपत्र आहे. त्यांनीही शरद पवारांची मुलाखत घ्यावी. ते देतात का पाहूया?”

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

सोलापूर जिल्हा कारागृहात कोरोनाचा झाला होता उद्रेक, साखळी तोडण्यात प्रशासनाला यश!

प्लाझ्मा थेरपीसंदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान!

धारावीत पोलिस जीवाची बाजी लावून लढले, गृहमंत्र्यांकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप!

रूग्ण बरे होण्याचा दर वाढला तर चाचण्यांचं प्रमाण देखील वाढवलंय- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या