बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विरोधकांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये- संजय राऊत

मुंबई | सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं?. विरोधी पक्षाने पोलिसांच्या तोंडाला काळं फासू नये. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना झापलं आहे.

हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा, असं राऊत म्हणाले.

राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत. विरोधी पक्षाने त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्यासारखं आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

सचिन वाझेंच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारमध्ये दोन गट; राजकीय दबाव वाढला!

स्त्री होण्यासाठी पुरूष करतायेत लिंग बदल; गुजरातमध्ये लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

एवढी काळजी त्यांनी आधीच केली असती तर…- ज्योतिरादित्य शिंदे

कंगाल पाकिस्तानला भारत देणार कोरोना लसीचे इतके कोटी डोस!

…तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख पण राहणार नाहीत- निलेश राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More