महाराष्ट्र मुंबई

“महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचंय”

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात आणीबाणी लागू व्हावी, असं वाटतं. तशी परिस्थिती निर्माण करून फडणवीस यांना पुन्हा सत्तेत यायचं असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे सरकारकडून मराठा आंदोलकांची होणारी गळचेपी म्हणजे आणीबाणीच आहे, या फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. भाजपलाच हुकूमशाही आणि आणीबाणी हवी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुनही संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं.

मोदी सरकार हे ‘झिरो स्टँडर्ड’ आहे. दिल्लीत आंदोलन करत असलेल्या पंजाबी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अर्धे लोक भारतीय लष्करात आहेत. तरीही तुम्ही त्यांचा पाकिस्तानशी संबंध जोडून त्यांना देशद्रोही ठरवता. उद्या तुम्ही विरोधकांनाही देशद्रोही ठरवाल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

दरम्यान, सरकारकडे बहुमत असले तरी लोकशाही व्यवस्थेत त्यांना विरोधी पक्षांचा आवाज ऐकावाच लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

अजित पवारांनी भर सभागृहात स्वीकारलं सुधीर मुनगंटीवार यांचं ‘ते’ चॅलेंज

फेकुचंद पडळकर म्हणत टीका करणाऱ्या राऊतांना गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या