मुंबई | जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. पण मागचं विसरुन पुढे जावं ही आमची भूमिका असते. आम्हीही जुनी थडगी उकरली तर तुमच्या पापाचे सांगाडेच सापडतील, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला दिलाय.
किरीट सोमय्या हे माजी खासदार आहेत. त्यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांनी खोटेनाटे आरोप करणं थांबवावं, असं संजय राऊतांनी म्हटलंय.
आम्ही बोलावं असं महान कार्य त्यांनी केलं नाही. ते माजी खासदार आहेत. त्यांनी त्यांचं काम करावं. त्यांना त्यांचा पक्षही गंभीरपणे घेत नाही. ते जे बोलतात त्यामुळे त्यांच्याच पक्षाची विश्वासहार्यता कमी होत आहे. याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
सरकारला कितीही अडचणीत आणण्याचं काम केलं तरी हे सरकार पाच वर्षे स्थिर राहणार आहे. उद्धव ठाकरे हेच पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील, असंही राऊत यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-
दिवाळीला ‘सॅल्यूट टू सोल्जर’ म्हणून एक दिवा लावूया; पंतप्रधान मोदींचं आवाहन
संघाच्या पथसंचलनाविरुद्ध हायकोर्टात याचिका; काठ्या बाळगण्यावर आक्षेप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा जैसलमेर सीमेवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार!
भाजपकडून महाराष्ट्रातील या तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी!