बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून काँग्रेस नेते राहुल गांधींना आणीबाणीच्या मुद्द्यावरुन फटकारलं आहे. तसेच केंद्र सरकारवर देखील सडकून टीका केली आहे.

आणीबाणी म्हणजे लोकशाही रुळावरून घसरली असे तिचे वर्णन खुद्द इंदिरा गांधींनीच केले होते. त्यानंतर आता आणीबाणी चुकीची होती अशी खंत आता राहुल गांधीयांनी व्यक्त केली. तशी गरज होती काय? आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचं?, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी राऊतांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी मोदी सरकारच्या कारभारावर भाष्य करत सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे, असा घणाघात राऊतांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे लोक आणीबाणीच्या नावाने आजही दळण दळत आहेत याचे आश्चर्य वाटते. तापसी पन्नू, अनुराग कश्यपसह चारजणांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त हा मजकूर लिहीत असताना आले. हे चौघे सतत देशातील सद्यस्थितीवर खुलेपणाने बोलत असतात. कदाचित टीकाही करीत असतात. आता या चारजणांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतले हे चारजण सोडून बाकी सगळे ‘साव’ आहेत? आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असं म्हणावं अशीच आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केलं भारतीय रेस्टॉरंट; पूजेचे फोटो केले शेअर

गोपीचंद पडळकरांनी आता थेट उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, म्हणाले…

अबब…यंदा हापुस आंब्याच्या किमतीने मोडला 100 वर्षांचा रेकाॅर्ड

जिद्दीला सलाम! वडिलांचा मृतदेह समोर असताना मंगलने दिली CA ची परीक्षा

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More