बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जिथे सत्ता नाही तिथे राज्यपालांच्या माध्यमातून भाजप सत्ता राबवतंय”

मुंबई | ज्या राज्यात भाजपची सरकारे नाहीत तिथे भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवतंय, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. ते दिल्लीच माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

दिल्लीत सध्या काय चाललं? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपालही त्याच पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपालही त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या. काही हरकत नाहीत. दम लागून पडाल तुम्ही, असा टोला राऊत यांनी राज्यपालांना लगावला आहे.

आम्ही सांगू तेच करा आणि आम्ही सांगू तेच बोला. आम्ही सांगू तिच लोकशाही ही सरकारची भूमिका आहे. हा 125 कोटी लोकांचा देश आहे. या देशाने स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी अनेक लढाया लढल्या आहेत. ज्यांनी स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर हल्ले केले ते राजकारणातून नंतर संपले आहेत. हा या देशाचा इतिहास आहे. सरकार कोणत्याच विषयावर बोलायला तयार नाही. सरकारला विरोधकांचा आवाजच ऐकायचा नाही, असा आरोपही संजय राऊतांनी केलाय.

दरम्यान, आम्हाली खात्री आहे. विरोधी पक्षाला काय म्हणायचंय ते सर्व प्रमुख पत्रकार कोर्टात मांडतील. पेगॅससवर चर्चा व्हावी ही आमची साधी मागणी आहे. देशात हेरगिरीचं काय कांड चाललंय ते देशाला जाणून घेण्याचा अधिकार नाही का?, असा सवाल राऊतांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांनाच पडली मदतीची गरज, पाहा व्हिडीओ

वाढदिवसाच्या नावाखाली केकची नासाडी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पाहा व्हिडीओ

नोकरदारांसाठी गुड न्यूज; एकाच वेळी खात्यावर मोठी रक्कम जमा

शरद पवारांकडून अमित शहांना खास निमंत्रण; लवकरच अमित शहांचा पुणे दौरा

अबब! प्रियांकाच्या अमेरिकेतील रेस्टॉरंटमधील मुंबई वडापावची किंमत ऐकून थक्क व्हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More