“उद्धव ठाकरेंच्या जोरदार भाषणामुळे विरोधकांना चिलमीत गांजा भरुन दम मारो दम करावं लागलं”
मुंबई | शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज सामनामध्ये ‘कमी प्रतीचा गांजा’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजप नेत्यांवर थेट हल्ला केला आहे. विरोधी पक्षाचे नेते कोणत्या नशेत बोलतात, याचा तपास एनसीबीने करावा, असं संजय राऊत म्हणालेत.
दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळ्या भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
फडणवीस यांनी तर ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?” अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?, असा सवाल संजय राऊतांनी केलाय.
दरम्यान, एक आण्याचा गांजा मारला की, भरपूर कल्पना सुचतात असे एकदा लोकमान्य टिळक उपहासाने बोलले होते. आताही भाजप पुढाऱ्यांच्या तोंडून जी भन्नाट मुक्ताफळे व शिमगोत्सव सुरू आहे, त्यामागे लोकमान्यांनी जे ‘गांजापुराण’ सांगितलं ते आहे काय? एनसीबीने या सगळ्याचा तपास करायला हवा. वाटल्यास भानुशाली, गोसावी, फ्लेचर या ‘भाजपाई’ कार्यकर्त्यांना घेऊन धाडी घालाव्यात, हवे तसे पंचनामे करावेत, पण दसरा मेळाव्यानंतर भाजप नेते कोणत्या नशेत बोलत आहेत ते पाहावंच लागेल, अशी टीका राऊतांनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे”
काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळल्याने दोघांचा मृत्यू
‘…तर शहरात पाय ठेवणार नाही’; अमोल कोल्हेंनी भाजपला दिलं चॅलेंज
राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी
भाजपचं टेन्शन वाढलं! उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी काँग्रेसचा चेहरा
Comments are closed.