बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी”

मुंबई | ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून एखाद् दुसरा आमदार गळास लागेल, पण त्यातून बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी, असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय.

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीवर सामनाच्या रोखठोक या सदरातून भाष्य केलं आहे. तसेच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून त्यावर वाद होईल आणि सरकार पडेल, अशी चर्चा रंगली आहे. पण, असं जे पसरवलं जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हा पाच वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना-भारतीय जनता पक्षाचं सरकार आलंच असतं आणि त्यात पुन्हा एकदा शिवसेना दुय्यम भूमिकेत सहभागी झाली असती तर नवं काय घडलं असतं? पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सहभागी झाली हे चित्र कलाटणी देणारे ठरलं. इथे एक लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कधीच समजून घेतला नाही, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘…म्हणून इतक्यात पेरणी करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

‘राष्ट्रवादी अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रिपदावर दावा करेल पण…’; संजय राऊतांचा खुलासा

केंद्र सरकारचा 1 निर्णय आणि कोट्यवधी सरकारी कर्मचाऱ्यांना झटका!

“काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका, कारण…”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More