बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी- संजय राऊत

मुंबई | बेळगावात फक्त 15 टक्के मराठी भाषिक असल्याचा अजब निष्कर्ष कर्नाटक सरकारने काढला आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी यावरून ठाकरे सरकारला सवाल केला आहे.

बेळगावमध्ये 60 ते 65 टक्के मराठी बांधव आहेत आणि ती संख्या कायम आहे. फक्त कर्नाटकने राजकीय स्वार्थसाठी त्या संपूर्ण भागाचे कानडीकरण करून मराठी टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही सीमाभागातील बहुमत हे मराठी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने सीमाभागासाठी दोन मंत्री नेमले आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी तात्काळ तिथे जाऊन चर्चा करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारला त्या संदर्भात पाऊल टाकावे, असे वाटत नसेल, तर हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलेन, असं संजय राऊत यांनी सांगतलं आहे.

बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला असला तरीही मराठी उमेदवारांना पडलेली मते भाजपपेक्षा अधिक आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप सत्तेवर आला आहे. मराठी भाषिक अल्पसंख्याक आहेत, असं म्हणत असतील तर ते अत्यंत खोटं आहे. याच्यामागे काहीतरी डाव आहे. महाराष्ट्र सरकारने यावर भूमिका घ्यायला हवी. राज्य सरकार गप्प का बसलंय हे मला कळत नाहीये, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“जेव्हा पण घटस्फोट होतो, तेव्हा दोष नेहमी पुरूषांचाचं असतो”

महाविकास आघाडीमुळं मोठा त्रास, शिवसेना सोडताना ‘हा’ नेता रडला!

देवेंद्र फडणवीसांचा मोठा डाव; भाजपकडून शिवसेना नेत्याला विधानसभेची उमेदवारी

एनसीबीनं ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखच्या मुलाचा पहिला व्हिडीओ आला समोर!

मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More