बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच’; संजय राऊत आक्रमक

मुंबई | शिवसेनेची धडाडती तोफ आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच शिंदे सरकार आणि भाजपवर आपले टीकेचे धनुष्यबाण सोडत असतात. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिंदे – फडणवीस सरकार तसेच बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. त्यांनी तिखट आणि सडेतोड टीका करत बंडखोर आमदारांना धारेवर धरलं.

खरी शिवसेना कुणाची? याचे पुरावे सादर करण्याची वेळ बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेवर आणावी, यासारखे मोठे पाप नाही. यासारखं महाराष्ट्राचं दुर्देवं नाही. आणि ते पाप शिंदे गटाने केलं आहे, त्यामुळे जनता त्यांना कधीच माफ करणार नाही. दिल्लीच्या लोकांना शिवसेना संपवायची आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातील मराठी लोक वापरले जात आहेत, असं यावेळी राऊत म्हणालेत.

शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणणाऱ्यांना राज्याची जनता माफ करणार नाही. शिवसेनेसाठी शहिद झालेले आणि तुरुंगात गेलेले लोक शिवसेनेचा पुरावा आहे. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लोकसभाध्यक्षांना तीन पत्रे लिहून देखील ते उत्तर देत नाहीत आणि फुटीर गटाच्या एका पत्रात लगेच त्यांची कामे कामे होतात, असा आरोप राऊतांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्यावर केला.

महाराष्ट्रात वासू-सपना सरकार आहे. महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात नाही. दोन मंत्र्याच्या कामाला सरकार म्हटलं जात आहे. महाराष्ट्रातील जनता या सरकारची आणि बंडखोरांची गाढवावरुन धिंड काढणार, जनता बंडखोरांची आणि नव्या सरकारची राजकीय तिरडी बांधणार आहे, असं यावेळी राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या –

मंत्र्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More