बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मॅनेजर दिल्लीत बसले आहेत”

मुंबई |   आज सकाळी काँग्रेसला चिमटे काढणारा अग्रलेख सामनात प्रसिद्ध झाल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने सामना सुरू झाला आहे. संजय राऊतांच्या टीकेला काँग्रेसने प्रत्युत्तर दिल्यानंतर राऊतांनी एक पाऊल मागे घेतल्याचं दिसत आहे.

खाट कितीही कुरकुरली तरी राहुल गांधींसारखे मॅनेजर दिल्लीत बसले आहेत, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. खाटेने कुरकुर केली तरी ती दुरूस्त करायला किंवा तिचा व्यवस्थित मेटेनन्स ठेवायला दिल्लीत राहुल गांधी आहेत. ते चांगले नेते आहेत, असं राऊत म्हणाले आहेत.

सरकार पाच वर्ष चालावं ही सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार आणि शिवसेना या सर्वांची ठाम भूमिका आहे. आणि हे सरकार पाच वर्ष अगदी व्यवस्थित चालणार यात कोणतीही शंका नाही, असा विश्वास देखील राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसची जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते, अशा शब्दात राऊतांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, असं राऊत म्हणाले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

“सत्ताधाऱ्यांनो सत्तेच्या खाटेची चिंता नंतर करा, आधी पेशंटचा खाटांचं बघा”

“सुशांतनं 7 फिल्म साईन केल्या होत्या, 6 महिन्यात सर्व काढून घेण्यात आल्या”

महत्वाच्या बातम्या-

एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांच्या भेटीला; पोलिसांकडून अंकिताचीही चौकशी

सुशांतबद्दल आता प्रेम व्यक्त करणाऱ्या कलाकारांवर सैफ संतापला, म्हणाला…

धक्कादायक, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं कोरोनामुळे निधन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More