बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता भाग सोमय्या भाग चित्रपट काढावा”; राऊतांचा खोचक टोला

मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात गोंधळ सुरू आहे. असं असताना आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. अशातच न्यायालयाने सोमय्यांना आयएनएस विक्रांत प्रकरणात मोठा झटका दिला आहे.

आयएनएस विक्रांत प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोपावरून सध्या राज्यात राजकारण पेटलेलं आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. परिणामी आता संजय राऊतांनी सोमय्यांवर जहरी टीका केली आहे.

सोमय्यांवर टीका करताना राऊत यांनी द काश्मीर फाईल्सच्या दिग्दर्शकांना सल्ला दिला आहे. काश्मीर फाईल्सवाल्यांनी आता भाग सोमय्या भाग हा सिनेमा काढला पाहिजे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. सोमय्या पिता-पुत्र देश सोडून पळून जाऊ शकतात, अशी शंकाही राऊत यांनी उपस्थित केली आहे.

दरम्यान, राऊत यांच्या टीकेनंतर आता भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार वाद रंगला आहे. पोलिसांनी आयएनएस विक्रांत प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर सोमय्या विरोधकांच्या रडारवर आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“ठाकरे सरकार हे जगातील सर्वात भ्रष्ट सरकार, शरद पवारांच्या…”

मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना दिलासा नाहीच; 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी वाढवली

किरीट सोमय्यांना अटक होणार?; न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

अनुष्का शर्माला आवडली हिरव्या वाटाण्याची भाजी अन् आळूची वडी; फोटो शेअर करत म्हणाली…

“शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यास ठाकरे सरकार जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More