महाराष्ट्र मुंबई

‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल- संजय राऊत

File Photo

मुंबई | कानडी सरकारचा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद संपवावाच लागेल, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटलं आहे.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मणरावांचे म्हणणे बरोबर आहे. महाराष्ट्राला कर्नाटकची अर्धा इंचही जमीन नको आहे. महाजन अहवालानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला भूभाग व त्याशिवाय कर्नाटकात जोरजबरदस्तीने कोंबलेला मराठी भाग, जो महाराष्ट्राच्या हक्काचा आहे, तेवढाच तुकडा महाराष्ट्राला हवा आहे बेळगावची लढाई त्यासाठीच सुरु आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

सवदींसारख्या बिनडोक लोकांनी सीमा लढ्याचा इतिहास जरा समजून घेतला पाहिजे. ते पाळण्यातली गोधडी भिजवत होते त्याआधीपासून बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी लढत आहेत, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली आहे.

हे प्रकरण न्यायालयात पडून असताना बेळगावसह सीमा भागातून मराठी भाषा, संस्कृतीच्या खुणा उखडून टाकण्याचा चंग कानडी सरकारने बांधला आहे. हा राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद आहे. तो संपवावाच लागेल, असं राऊतांनी आग्रलेखात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“कृषी कायदे परत घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन”

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स; व्हिडीओ व्हायरल!

“देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत त्यांनी आता सुदर्शन काढावं”

“शरद पवारांनी दिलेली वाट तात्पुरती, कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या