महाराष्ट्र मुंबई

“देशात कोणीही सेक्युलर नाही, स्वत:ला सेक्युलर म्हणाणारे सर्वाधिक धर्मांध”

File Photo

मुंबई | देशात कोणीही सेक्युलर नाही. या देशात कोणीही सेक्युलर होऊ शकत नाही. जे सेक्युलर असल्याचं म्हणातात तेच सर्वाधिक धर्मांध असतात, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. ही मुलाखत शुक्रवारी रात्री यू ट्यूबवर प्रसारित करण्यात आली. यामध्ये संजय राऊत यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

सेक्युलर ही एकप्रकारची शिवी आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर राजकारणात करण्यात आला आहे. सेक्युलर या शब्दामुळे देशात हिंदू मुस्लीम अशी सरळ विभागणी झाली. तुम्ही केवळ हिंदूंना शिव्या दिल्यानं तुम्ही अधिक सेक्युलर असल्याचं म्हटलं जातं. हे चुकीचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

आपला देश घटनेच्या आधारावरच चालणारा आहे. सर्वांना समान हक्क मिळाला पाहिजे. या देशात पहिल्यापासून जे राजकारण सुरू आहे त्यात केवळ मुस्लीम धर्माचाच आधार घेतला जात आहे. त्याला आमचा विरोध आहे, असं राऊतांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध- देवेंद्र फडणवीस

मला देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय स्तरावर मोठं झालेलं पाहायचंय- संजय राऊत

भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा ओबामांना कोणी दिला?; संजय राऊत यांचा सवाल

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता

“किरीट सोमय्या यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांनी…”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या