महाराष्ट्र मुंबई

यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान- संजय राऊत

मुंबई | यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसचं महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकार चालवण्याचा खूप अनुभव आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांचं कौतुक केलं आहे. ते मुबंईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील तर त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. शरद पवार शेतकऱ्यांसोबतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईलच, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच फॉर्म्युल्याची चिंता करू नका ते उद्धव ठाकरे ठरवतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

आम्ही पुन्हा येईन, पुन्हा येईन सांगणार नाही. आम्हाला महाराष्ट्रातच राहायचं आहे. राज्यातच राजकारण करायचं आहे. तसेच आम्ही कायम सत्तेत राहू. येत जात राहणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी  काँग्रेस आणि शिवसेनेची एकसूत्री कार्यक्रम ठरवण्याचं काम सुरू आहे. तीन पक्षांची चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या