पुणे | ठाकरे सरकार अल्पावधीतच कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही एक वर्ष पूर्ण करत आहोत, अंसं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय.
संजय राऊत पुण्यात श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. तेव्हा हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. ठाकरे सरकार लवकर कोसळेल अशा पैजा लावल्या होत्या. पण पुढच्या महिन्यात आम्ही आता एक वर्ष पूर्ण करत आहोत, असा चिमटा संजय राऊत यांनी विरोधकांना काढला.
राज्यातील सरकार पडेल असं केंद्रातील नेत्यांनी कधीच म्हटलं नाही. राज्यातील नेते म्हणायचे. त्यांनीही आता असं बोलणं बंद केलं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
“…तर ही धर्मांधता म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल”
दिलासादायक! अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नोहेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग
प्रसंगी कर्ज काढू, पण दिवाळीपूर्वी वेतन देणारच; अनिल परब
पाकिस्तानकडून पुलवामा हल्ल्याच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले…
काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही- अशोक चव्हाण