पुणे महाराष्ट्र

‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’

पुणे | मेहबुबा मुफ्ती असो किंवा फारुख अब्दुल्ला असोत, कोणीही चीनची मदत घेऊन भारतीय संविधानाला आव्हान देण्याची भाषा करत असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय.

फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करुन 10 वर्षांसाठी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवा. मुळात ते अशाप्रकारचे वक्तव्य करुन बाहेर फिरुच कसे शकतात, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी चीनची मदत घेण्याची भाषा करणाऱ्या फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांना संजय राऊत यांनी फटकारलं आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास चीनची मदत घेऊ, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी फारुख अब्दुल्ला यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”

“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”

फ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

पंकजा मुंडे शिवसेनेत येणार का?; संजय राऊतांचे सूचक विधान

“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या