बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काहीही झालं तरी महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं”

मुंबई | रविवारी पावसाने मुंबईत थैमान घातलं होतं. पावसामुळे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडल्या. यावरून विरोधकांनी महापालिकेवर सडकून टीका केली. याला शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे. शनिवारच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची दरड कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबई पावसामुळे काही झालं की महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, असं म्हणत शिवसेनेनं अग्रलेखातून विरोधकांना फटकारलं आहे.

मुंबईत शनिवारी आणि रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने 30 जणांचे बळी घेतले. एकूण 11 ठिकाणी दुर्घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. तर दुसरीकडे संरक्षत भिंत घरांवर कोसळली. या दोन्ही दुर्घटनांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीची साखरझोप या जीवांसाठी काळझोपच ठरली, असं शिवसेनेनं म्हटलंय.

मुंबईत तब्बल 299 ठिकाणी दरडींवर झोपडपट्टय़ा आहेत. त्यापैकी 60 ठिकाणे धोकादायक तर 20 ठिकाणे अतिधोकादायक आहेत. मुंब्रा, कळवा येथेही डोंगरउतारावर शेकडो कुटुंबे राहतात. प्रत्येक पावसाळय़ात यापैकी कुठे ना कुठे दुर्घटना घडतात, असं शिवसेनेनं म्हटलंय.

मुंबईतील डोंगरउतारांवरील वसाहतींमध्ये लाखापेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. गेल्या 20 वर्षांत त्यातील 200 पेक्षा जास्त लोकांचा दुर्घटनांमध्ये जीव गेला आहे. ही डोंगरउतारावरील घरे काय किंवा जुन्या धोकादायक इमारती काय, मुंबईचा एक गंभीर आणि गुंतागुंतीचा प्रश्न बनला आहे, असंही शिवसेनेनं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“आपल्या करिअरचं काही सांगता येत नाही, सेव्हिंग्स पाहिजेच”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘एवढे’ लाख नागरिक बाधित होतील; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला अंदाज

सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला पंतप्रधानांची फक्त 3 मिनिटांची हजेरी; विरोधक आक्रमक

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राहुल-दिशाच्या लग्नानंतर आता राखी म्हणतेय, ‘पुढच्या वर्षी माझ्या लग्नाला यायचं’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More