बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण…- संजय राऊत

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता. यानंतर वाढत्या दबावामुळे अखेर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपवला. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही जनतेचा आवाज ऐकतो. खरं तर संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची गरज नव्हती, पण तरीही राजीनामा घेतला, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

संजय राऊत यांनी यावेळी बोलताना इडीवर देखील टीकास्त्र सोडलं. ईडीचे काम बेहिशोबी पैसा बाहेर काढणे हे आहे. काळा पैसा बाहेर काढू असं भाजप म्हणालं होतं. 7 वर्षात काय केलं? मोदींचे माझे चांगले संबंध आहेत. महाराष्ट्र सरकार गेल्याने माझ्या मागे ईडी लावली. बायकांना नोटीस देता आम्हाला द्याना, असं राऊत म्हणाले.

दरम्यान,केंद्रात दोन-चार लोकं सोडले तर बाकी दिल्ली मूक आणि बधीर आहे. ज्या पक्षाचे सरकार आहे त्यांच्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. दिल्ली आता मुडद्यांचं शहर झालंय, अशी बोचरी टीका राऊतांनी केंद्र सरकारवर केली.

थोडक्यात बातम्या-

“काही लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दुकानं चालवून संसदेत जातात”

पूजा चव्हाणची आजी म्हणणाऱ्या शांताबाईंचं पितळ उघडं, पूजाच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस, म्हणाले…

“…तर अशा वादळांची सरकारला आता सवय झालीये”

…अन् ‘या’ पत्रकाराने शेतकरी आंदोलनातच 12 लाखाच्या नोकरीचा दिला राजीनामा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More