बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युपीएच्या नेतृत्वाबाबत संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट, म्हणाले…

नवी दिल्ली | शिवसेन नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील काही नेते युपीए 2 करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्या चिंतेने मी बोलत आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.

शरद पवार देशाचे नेते आहेत. युपीएविषयी बोलण्यासाठी त्यात असलं पाहिजे असं नाही. देशात मजबूत विरोधी पक्ष आघाडी स्थापन झाली पाहिजे. महाराष्ट्रातील नेत्यांना कळत नसेल तर त्यांनी अभ्यास करावा, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊतांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

या विषयावर सोनिया गांधी बोलणार असतील तर आम्ही उत्तर देऊ. या देशात उत्तम विरोधी पक्ष निर्माण झाला नाही तर भाजपचा पराभव कसा करणार याचं उत्तर द्यावे. याचं दिल्लीत येऊन उत्तर द्यावे. महाराष्ट्रात बसून देऊ नये. हा विषय जिल्हा किंवा तालुक्याचा नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, भाजप समोर लढायचं असेल युपीए मजबूत होणे गरजेचे आहे. ते मजबूत होऊ नये असं महाराष्ट्रील लोकांना वाटत असेल तर तसं स्पष्ट सांगावंच तिसरी आघाडी, पाचवी आघाडी नौटंकी झाली ती फेल झाली, असं संजय राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

सरकारने जबरदस्तीने घरी बसवलं म्हणत IPS अधिकाऱ्याने केलं असं काही की…

“प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक कोटी रूपये, हेलीकाॅप्टर देणार आणि चंद्रावरही नेणार”

“भारतात 30 टक्के मुस्लीम एकत्र आले तर चार पाकिस्तान तयार होतील”

” भाजपमध्ये दलितांना किंमत नाही, राष्ट्रपतींनी नमस्कार केला तर मोदी त्यांची दखल घेत नाही”

धक्कादायक! फुलांसारख्या दोन लेकींसह बापाने विहिरीत उडी मारून केली आत्महत्या

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More