Top News महाराष्ट्र मुंबई

‘अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं’, असं म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचं उत्तर

मुंबई | मेट्रोसाठी कांजुरमार्गयेथील 102 एकर जमीन  एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालायने स्थगिती दिली.

यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनी सरकारला अहंकाराचा प्रश्न न करता आरेत काम सुरू करावं, असा सल्ला दिला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊतांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागेल. आरेचं जंगल, प्राणी, निसर्ग वाचवणं यामध्ये कोणता अहंकार आहे. हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. नद्या, वाघ, जंगल वाचवा हा तर मोदी सरकारचा कार्यक्रम आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुख: मी समजू शकतो. पण अशाप्रकारे केंद्राच्या अख्त्यारित असणाऱ्या यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नसल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…तर लग्नाचं वचन देऊन केलेलं सेक्स म्हणजे बलात्कार असं नाही- उच्च न्यायालय

येतो तो शुरू होते ही खतम हो गया! कसोटीत पहिल्याच षटकात शून्यावर पृथ्वी शॉ झाला बाद; पाहा व्हिडीओ

‘शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याआधी तुला कमीत कमी लाज वाटली पाहिजे’; दिलजीतचं कंगणाला उत्तर

आजपासून मुंबईतील ‘या’ मार्गावर धावणार एसी लोकल!

“कोविडने अमेरिकेसारख्या देशाची निवडणूक थांबली नाही अन् आपण संसदेचे  हिवाळी अधिवेशन होऊ देत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या