बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क का वापरायचा नाही याचं ठोस कारण राज ठाकरेंनी सांगावं- संजय राऊत

मुंबई |  राज्याता सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी आणि लॉकडानच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे कोराना नव्याने डोकं वर काढत आहे तर काही नेतेमंडळीच मास्क लावताना दिसत नाहीत. अशातच  मराठी भाषा दिना दिवशी मनसेने शिवाजी पार्कवर एक कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या तोंडावर मास्क लावलं नव्हतं. तेव्हा पत्रकारांनी त्यांना तुम्ही मास्क का लावत नाही असा सवाल केला. यावर मी मास्क घालतच नाही, असं उत्तर राज ठाकरेंनी दिलं. यावरून शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंबद्दल काय बोलणार ते मनसेचे पक्षाचे नेते आहेत पण मास्क का वापरत नाहीत याचं त्यांनी ठोस विश्लेषण करणं गरजेचं आहे. मास्क हीच खरी लस आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान वारंवार हेच सांगत आहे. त्याचं खरं पालन करणं गरजेचं आहे. वैद्यकीय कारण काय आहे?, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ते सुद्धा कलाकार आहेत, जाणकार आहेत. लोकांचे नेते आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नाशिक दौऱ्यातही राज ठाकरेंनी मास्क लावलं नव्हतं. नाशिकचे माजी महापौर मुर्तडक यांनाही राज ठाकरे यांनी चेहऱ्यावरील मास्क काढण्यास सांगितलं. यावरून राऊतांनी ठाकरेंना हा सवाल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली – पंकजा मुंडे

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवऱ्याने ‌व्हाॅटसअॅपला तिचा डीपी न ठेवल्याने पत्नीने केलं असं काही की….

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी!

‘जैश ए हिंद या नावानं…’; अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचा गंभीर आरो

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांच नवं गाणं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More